औंध :
औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत. यावर त्वरित उपाय योजना करून साथ रोग आटोक्यात आणावेत अशी मागणी मी औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. गिरीश दपकेकर यांच्याकडे भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली. याबाबतचे पत्र आज औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाला दिले.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पावसाचे पाणी मात्र पावसाचे पाणी सर्वत्र साठून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे यामुळे औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत.
नागरिकांचे स्वास्थ बिघडल्याने महानगरपालिका,शासकीय रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. नागरिक मोठ्या संख्येने डेंगीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या साथरुग्णांवरील औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी.
तसेच क्षेत्रीय कार्यालयामार्फत आपण औषध फवारणी, परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्या तसेच वस्ती पातळीवर धूर फवारणी यासारख्या उपाययोजना कराव्यात , परिसरातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता, जनजागृती करणे, याप्रमाणेच डास उत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, डासांची उत्पत्तीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे आदी उपाय योजना तातडीने कराव्यात ही विनंती. अशी विंनती या पत्राद्वारे केली आहे.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…