November 22, 2024

Samrajya Ladha

हरित आर्थिक साक्षरतेसाठी समाजाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग” – जि. एस. रावत, सी जि एम नाबार्ड

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात, वाणिज्य विभाग, फ्युचर बँकर्स फोरम यांच्या वतीने 11 ऑगस्ट हा दिवस ‘बँकिंग डे’, पहिले भारतीय आर बी आय गव्हर्नर श्री सी डी देशमुख यांच्या स्मरणार्थ 2018 पासून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमासाठी श्री जि एस रावत, चिफ जनरल मॅनेजर, नाबार्ड, प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय खरात यांनी विद्यार्थ्यांना जे मिळालंय त्याबद्दल व ज्यांच्यामुळे मिळालंय त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा असे सांगितले.

श्री जि एस रावत सी जि एम नाबार्ड, ” देशामध्ये जशी आर्थिक साक्षरता महत्वाची आहे तशीच ग्रीन आर्थिक साक्षरता महत्वाची आहे.सोलर पॅनेल वापरणे, पर्यवरणाशी निगडित शेती करणे, व्यवसाय करणे गरजेचे आहे. डिजिटल साक्षरता, सामाजिक सुरक्षा कागदपत्रांची पूर्तता करणे याबद्दल जागृतीसाठी विद्यार्थी सहभागी झाले तर या योजना अधिक यशस्वी होतील. त्यासाठी मॉडर्न कॉलेज एक रोल मॉडेल आहे .”

या प्रसंगी उपस्थितानी (ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, बँकर्स) त्यांच्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठी शपथ घेतली.
फ्युचर बँकर्स फोरम हा बँकिंग उपक्रमासाठी तयार केलेला गट असून या गटाने बँक मित्र, विद्यार्थी व समाज बँक कनेक्ट, जन धन योजना, मॉक बँकिंग, मॉक पर्लिमेंट, माय नेशन माय प्राईड असे वेगवेगळे उपक्रम राबवित असते. दरवर्षी नवीन वर्ष हे विद्यार्थी सिनियर सिटीझन बरोबर साजरे करतात.

या सर्व कार्यक्रमाची दखल भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतली व महाविद्यालयाला वित्तीय सहाय्यता केंद्र जाहीर केले. या अंतर्गत एफ बी एफ ने ग्रामीण, निमग्रामीण, शहरी विभागात आर्थिक साक्षरतासाठी पंतप्रधानच्या विविध योजनावर कार्यशाळा घेऊन लोकांना बँकेशी जोडून दिले. या सगळ्या कार्यक्रमात विद्यार्थी अतिशय उत्तम काम करतात. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येतो.

या वर्षी एफ बी एफ प्राईड हा सी डी देशमुख सरांच्या नावाचा पुरस्कार मिस सीमा चांदोरा तर विशेष कामगिरीसाठी पूनम कुर्ले यांना देण्यात आला.

सीमा चांदोरा म्हणाली, एफ बी एफ मुळे माझ्या मधील नेतृत्व गुण वाढीस लागले.मला बँकिंग हे पुस्तकी न राहता ते प्रक्ष्यात उतरविता आले. यात मला शिक्षकांचा पूर्ण सहभाग मिळाला.

कार्यक्रमाला डॉ शुभांगी जोशी, उपप्राचार्य, वाणिज्य विभाग यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण कार्यक्रमआचे आयोजन प्रो विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ पल्लवी निखारे यांनी तर पाहुण्याची ओळख ऍडव्होकेट प्रो अदिती पिंपळे यांनी केली. बँकिंगची शपथ विद्यार्थिनी मानसी सिंग हिने दिली. श्री विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, यांनी कार्यक्रमाला खास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह,पी ई सोसायटी व डॉ. प्रकाश दिक्षीत, उपकार्यवाह , पी. ई. सोसायटी यांनी अभिनंदन केले.