September 19, 2024

Samrajya Ladha

औंध गावातील कचरा समस्या सोडविण्यासाठी दोन घंटा गाड्या मिळाव्यात म्हणून सहाय्यक आयुक्तांकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली मागणी..

औंध :

औंध गावातील हनुमान मंदिर समोरील चौकात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची सोय करावी याकरिता परिसरातील नागरिकांच्या वतीने गणेश कलापुरे यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांना नागरिकांच्या सही निशी निवेदन देण्यात आले.

या निविदांमध्ये सांगितले आहे की औंध गावातील हनुमान मंदिर समोरील चौकात रोज मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो पण त्याचे संकलन करण्यासाठी गावांमध्ये घंटागाडी येत नाही.

या ठिकाणी ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी वेगवेगळ्या दोन गाड्यांची आवश्यकता आहे. तसेच ओला व सुका कचरा बाबत प्रबोधन जनजागरण करण्यासाठी फलक बोर्ड लावणे ही गरजेचे आहे.

या चौकात कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. या परिसरात नागरिक वाहतूक रहदारी करत असतात त्यामुळे हा प्रश्न गंभीर असून महापालिकेने त्वरित लक्ष घालून ही समस्या सोडवावी असे या निवेदनाने द्वारे सहाय्यक आयुक्तांना सांगितले आहे.