August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

आई हीच पहिली गुरु असा संदेश देत पेरिविंकलच्या पौड शाखेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पौड १० जुलै २०२५ :

गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पौड शाखेत गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला .

 

कार्यक्रमाची सुरुवात व्यास मुनी व सरस्वती मातेच्या पूजनाने दीपप्रज्वलन करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम संचालिका शिवानी बांदल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व द्रोणाचार्य- एकलव्याच्या कथेतून शिक्षिका सौ. श्रेया गडदे यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी ही त्यांचे गुरू विषयी मनोगत व्यक्त केले. आणि इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी *”गुरूंचा सन्मान “* ही नाटिका सादर केली.

याप्रसंगी आपल्या आयुष्यामध्ये आपला पहिला गुरु आपली आई असते हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या माता पालकांना गुरुस्थान देऊन त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले . याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांकडून गौरविण्यात आले.

मुख्याध्यापिका विणा कदम मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका नेत्रा काकडे , प्राजक्ता वाघवले व इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता. आठवीच्या विद्यार्थिनी संस्कृती पिंगळे व संस्कृती भिलारे यांनी केले.