बाणेर :
बाणेर येथील गणराज चौकात असलेले अग्निशमन केंद्र आणि आपत्कालीन कक्ष अखेर सुरू झाले आहे. माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीनंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत हे केंद्र कार्यान्वित केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून बाणेर येथील गणराज चौकातील अग्निशमन केंद्राचे काम पूर्ण झाले होते, परंतु विविध प्रशासकीय कारणांमुळे ते सुरू केले जात नव्हते. अनेक माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी हे केंद्र सुरू करण्याची वारंवार मागणी केली होती, पण प्रशासनाकडून केवळ टाळाटाळ केली जात होती.
यावर, पुणे मनपाच्या माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना १७ मार्च २०२५ रोजी लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी बाणेर येथील अग्निशमन केंद्र आणि स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झालेले पंधरा प्रकल्प त्वरित दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी केली होती.
कळमकर यांच्या पत्राची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मनपा आयुक्तांना तात्काळ कारवाई करण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर, प्रशासनाने वेगाने काम करत आज हे अग्निशमन केंद्र आणि आपत्कालीन कक्ष सुरू केले आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले आहेत. बाणेर परिसरातील नागरिकांना आता आग आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळू शकेल, ज्यामुळे परिसराची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी