June 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान; अविनाश धर्माधिकारी प्रमुख वक्ते

बाणेर :

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त ‘हर घर सावरकर’ समिती, महाराष्ट्र राज्य, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील,लहू बालवडकर सोशल वेलफेअर आणि ब्राह्मण सांस्कृतिक संघ, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने आताच्या चालु घडामोडींवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २५ मे २०२५ रोजी, रविवारी सायंकाळी ६ वाजता बाणेर येथील बंटारा भवन येथे होणार आहे.

 

या कार्यक्रमात माजी आयएएस अधिकारी श्री अविनाशजी धर्माधिकारी ‘वक्फ कायदे / पहलगाम हल्ला / समान नागरी कायदा’ यावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आयोजकांनी नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.