June 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत पर्ल सोसायटी मागे अतिवृष्टीमुळे तुंबलेल्या ड्रेनेज लाईन राहुल दादा बालवडकर यांच्या प्रयत्नातून साफ!

बालेवाडी :

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. बालेवाडी परिसरातील पर्ल सोसायटीच्या मागील ड्रेनेज लाईन देखील पावसाच्या पाण्यामुळे तुंबली होती, ज्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.

 

या गंभीर परिस्थितीची दखल घेत, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांनी तातडीने पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे मनपा प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत जेटिंग मशीनच्या साहाय्याने येथील सर्व तुंबलेल्या ड्रेनेज लाईन साफ केल्या.

ड्रेनेज लाईन साफ झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. स्थानिक रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर आणि पुणे मनपा प्रशासनाचे त्वरित कार्यवाही केल्याबद्दल आभार मानले आहेत.