May 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर रस्त्यावर जखमी बेवारस व्यक्तीला जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनची मदत; ससून रुग्णालयात दाखल घडविले माणुसकीचे दर्शन…

बाणेर :

बाणेर रस्त्यावर विठ्ठल पवार नामक मराठवाड्यातील एक बेवारस व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनला मिळाली. त्वरित कार्यवाही करत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ॲम्बुलन्सच्या मदतीने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, फाउंडेशनचे कार्यकर्ते त्यांच्या उपचारांचा नियमित पाठपुरावा करत आहेत.

 

“सेवा हेच साध्य आणि सेवा हेच साधन” हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनने दाखवलेल्या तत्परतेमुळे एका गरजू व्यक्तीला वेळीच मदत मिळाली आहे. यापुढेही समाजातील दुर्बळ घटकांसाठी अशीच सेवा करण्याची बांधिलकी जपणार असल्याची भावना अध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.