May 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुनील चांदेरे यांच्या ‘ऐकलंत का?’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे :

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि लेखक श्री. सुनील चांदेरे यांच्या ‘ऐकलंत का?’ या दुसऱ्या साहित्यकृतीचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, प्रसिद्ध साहित्यिक व कवी रामदासजी फुटाणे, चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सर, पुणे जिल्ह्यातील अनेक माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी, पुणे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ आणि श्री. सुनील चांदेरे आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिर लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील चांदेरे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

श्री. सुनील चांदेरे यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांचे आभार मानले आणि आपल्या साहित्य प्रवासाविषयी माहिती दिली. त्यांनी अजितदादा पवार आणि उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार मानले.

या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.