May 2, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस मध्ये महिला भगिनींसाठी सौ पुनम विधाते यांच्या माध्यमातुन आरी वर्क क्लासचे प्रमाणपत्र वाटप..

सुसगाव :

सुस येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर च्या कार्याध्यक्ष सौ. पुनम विशाल विधाते यांच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी आयोजित आरी वर्क क्लासचे प्रमाणपत्र वाटप नुकतेच मुळशी तालुक्याच्या माजी सभापती सौ. सारिका ताई शंकर भाऊ मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

महिलांसाठी हा क्लास आयोजित करण्यात आला होता. या क्लासमध्ये महिलांना आरी वर्कचे प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे महिलांना स्वतःच्या कलागुणांना वाव मिळून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाली.

या कार्यक्रमात सौ. सारिका ताई शंकर भाऊ मांडेकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महिलांनी स्वतःच्या कलागुणांना ओळखून त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत करतात.”

सौ. पुनम विशाल विधाते यांनी महिलांना प्रोत्साहन देताना सांगितले, “महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण उपयुक्त ठरतात. नविन कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भरतेकडे महत्वाचे पाऊल पडावे म्हणून यापुढेही महिलांसाठी असे उपक्रम आयोजित करण्यात येतील.”

या कार्यक्रमाला सुस परिसरातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही असे उपक्रम आयोजित करण्याची मागणी केली. तृप्ती पारखे यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. तर यावेळी सौ वंदना चांदेरे, उर्मिला नंदकुमार पारखे उपस्थित होत्या.