May 24, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील युथिका सोसायटीमधील नागरिकांनी केला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध..

बाणेर :

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अमुस्लिम पर्यटकांवर झालेल्या भ्याड, अमानवी, निर्दयी आणि अमानुष दहशतवादी हल्ल्याचा युथिका सोसायटी, वीरभद्र नगर, बाणेर, येथील सर्व रहिवाश्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवत निषेध व्यक्त केला.

 

ही घटना मानवतेवर काळिमा फासणारी असून, आम्ही या दहशतवादी कृत्याचा जोरदार निषेध करतो. या भ्याड हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आमची भारत सरकारकडे मागणी आहे की, या कृत्यामागे असलेल्या पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान सरकारवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.

देशाच्या सुरक्षेसाठी, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दहशतवादाच्या विरोधात निर्णायक पावले उचलण्यासाठी आम्ही आपला पाठिंबा जाहीर करतो.