बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रोड ते मालपाणी बिल्डिंग दरम्यान पथदिव्यांच्या खांबांवर (स्ट्रीट लाईट पोल) असलेल्या अनधिकृत इंटरनेट नेट केबलवर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे २८०० मीटर लांबीची केबल कापून जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई मुख्य अभियंता (विद्युत) मनिषा शेकटकर, अधीक्षक अभियंता प्रमोद उंडे, उप-आयुक्त (परिमंडळ क्र. २) संतोष वारूळे, कार्यकारी अभियंता (विद्युत) सुरेश पवार आणि सहायक आयुक्त विजय नायकल यांच्या आदेशानुसार करण्यात आली. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्त वैशाली भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
नागरिकांची सुरक्षितता आणि तक्रारींची दखल
बाणेरमधील मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांवर खासगी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत केबलचे जाळे पसरवले होते. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणासोबतच पावसाळ्यात किंवा वादळी वाऱ्यामुळे या केबल तुटून अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.
या कारवाईबद्दल माहिती देताना विद्युत शाखा अभियंता प्रल्हाद पवार म्हणाले की, “नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक सुरक्षितता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या पथदिव्यांच्या खांबांचा वापर अनधिकृत केबलसाठी करणे धोकादायक आहे. यापुढेही अशा प्रकारे अनधिकृत केबलवर कारवाई सुरूच राहणार आहे.”
या मोहिमेमुळे पॅनकार्ड क्लब रोड परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून, महापालिकेच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे.





























More Stories
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम
*”‘मोठी स्वप्ने पाहा… भारत घडवा!’ — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा बावधन येथील पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत !!!!*