May 25, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील योगीराज पतसंस्थेला “राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था गौरव पुरस्कार” प्रदान …..

बाणेर :

गोवा सरकारच्या पी. डब्ल्यू. डी. सेवक को. ऑप. क्रेडिट सोसायटी व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगावी यांच्या वतीने आदर्श पतसंस्था म्हणून योगीराज पतसंस्थेला “राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था गौरव पुरस्कार ” प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष शंकरराव सायकर व तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी याबद्दल माहिती दिली की, संस्थेने दोनच शाखांमध्ये 31 मार्च 2025 अखेर 155 कोटी रुपयांच्या ठेवी, सभासद कर्ज 118 कोटी, इतर बँकेतील 61 कोटी रुपयांची गुंतवणूक, खेळते भांडवल 196 कोटी, एकत्रित व्यवसाय 173 कोटी झाला आणि 3 कोटी 84 लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. 29 वर्षात आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगती तसेच सामजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेले समाज कार्य या सर्व बाबींचा विचार करुण गोवा सरकारच्या पी. डब्ल्यू. डी. सेवक को. ऑप. क्रेडिट सोसायटी व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगावी यांच्या वतीने संस्थेला पुरस्कार दिला आहे.

मिळालेला हा पुरस्कार प.पू.गगनगिरी महाराजांच्या आशिर्वादामुळे तसेच संचालक मंडळाच्या नि:स्वार्थी सेवेमुळे, कर्मचारीवर्गाच्या प्रामाणिक सेवेबद्दल व खातेदारांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासामुळे मिळालेला आहे. मिळालेला हा पुरस्कार सर्वांना समर्पित करतो. असे तापकीर यांनी सांगितले.

यापूर्वीही संस्थेला राज्यातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा राज्यातील “आदर्श पतसंस्था” पुरस्कारही मिळालेला आहे. आणि परत एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद झाला आहे. संस्था करीत असलेल्या चांगल्या कामाबद्दल पुरस्कार देवून कौतुकाची थाप टाकल्याणे आमची जबाबदारी वाढली आहे व यापुढे अधिक चांगले काम संस्थेच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.