बाणेर :
बाणेर येथील सर्वे नं. ५५, ननावरे वस्ती परिसरातील अल्तुरा हिल्स सोसायटी, डीन्स रेसिडेन्सी आणि स्पिरो सोसायटीच्या नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि नवीन विद्युत पोल व लाईट बसवण्याच्या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा नुकताच स्थानिक नागरिकांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या सोहळ्यामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या परिसरातील विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. बाबुराव चांदेरे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत आणि याच प्रयत्नांचे फलित म्हणून आज या विकासकामांना सुरुवात झाली, असे नागरिकांनी यावेळी सांगितले.
या विकासकामामुळे या सोसायट्यांमधील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे, तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील प्रकाशामुळे सुरक्षितता वाढणार आहे. पुणे महानगरपालिकेने आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. लवकरच ही कामे पूर्ण होऊन परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
More Stories
म्हाळुंगे टीपी स्कीमसाठी अमोल बालवडकर यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन; प्रलंबित प्रकल्पाला गती देण्याची मागणी..
बाणेर च्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….
सुस येथील बेला कासा सोसायटीतील मिळकत कराच्या समस्यांचे अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून निराकरण