May 17, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध येथे सचिन मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दवाखान्याचे उद्घाटन

औंध :

भारतीय जनता पक्षाचे सदस्य सचिन मानवतकर यांच्या वतीने वाढदिवसानिमित औंध प्रभागातील नागरिकांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला. या मोफत दवाखान्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी शुभेच्छा देताना आमदार शिरोळे यांनी सांगितले की सचिन मानवतकर यांनी औंध येथील कस्तुरबा वसाहत व इंदिरा वसाहत येथे गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी जो मोफत दवाखाना केला आहे ही कल्पना खूप छान आहे. वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत मानवतकर यांनी मानवतेची निस्वार्थ सेवा करण्याचे कार्य हाती घेतले आहे, ते फारच कौतुकास्पद आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांच्या हातून अशीच समाजसेवा व रुग्णसेवा घडत राहो हीच सदिच्छा मी यावेळी व्यक्त करतो.

सचिन मानवतकर नेहमीच प्रभागातील नागरिकांसाठी नाविन्य पूर्ण कल्पनेतून काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात, त्यांच्या रूपे औंध परिसरात भारतीय जनता पक्षाला एक धडाडीचा कार्यकर्ता लाभला आहे : आमदार सिद्धार्थ शिरोळे

यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, दत्ताभाऊ खाडे , रवींद्र साळेगावकर, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, राहुल कोकाटे, गणेश बगाडे, संजय निम्हण, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, योगेश जुनवणे, अपर्णाताई कुऱ्हाडे, बाळासाहेब रानवडे, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, गणेश कलापुरे, शिवम बालवडकर, राजेश नायडू, विनोद धोत्रे, अशोक औताडे, शारदा पुलावळे, निशा मानवतकर, निजामपूरकर ताई, अनिता कांबळे, सुभद्रा कुंभार, आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी सचिन मानवतकर यांनी मान्यवरांनी उपस्थित राहून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त केले.