April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकलच्या बावधन शाखेत पूर्व प्राथमिक विभागाचा “न भूतो न भविष्यती” पदवीप्रदान समारंभ साजरा.

बावधन  :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन शाखेत आज शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी पूर्व प्राथमिक विभागातील मोठ्या गटाचा पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या सोहळ्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना “न भूतो न भविष्यती” अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांसाठी स्वागत गीत गायले. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या सोहळ्यात चिमुकले पदवीप्रदान पोशाखात मंचावर अवतरले जिथे लहानग्यांनी आपल्या सिनिअर केजी पदवी प्रमाणपत्र मोठ्या आनंदाने स्वीकारत जल्लोष केला. पूर्व प्राथमिक विभाग प्रशिक्षण पूर्ण झाल्याची व प्राथमिक विभागात पाऊल ठेवण्याची ही ग्वाही ठरली. पालकांनीही आपल्या अनुभवांना वाट मोकळी करून पालकांच्या प्रतिक्रिया सत्रात मनोगत व्यक्त केले.

संस्थेच्या संचालिका सौ. रेखा बांदल यांनी हा केवळ समारंभ नसून विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतलेल्या कष्टाचे व मेहनतीची शाश्वती असून असेच सहकार्य लाभावे असे सांगून प्राथमिक विभागात सर्वांचे स्वागत केले. तसेच संचालिका शिवानी बांदल यांनी सर्व मुलांच्या व पालकांच्या उपस्थितीला दाद देऊन हे सर्व मुले निरागस असून त्यांना घडवण्याचे काम शिक्षकवृंद करीत असून सर्वांचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी भाषण देऊन शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या शानदार सोहळ्याच्या निमित्ताने शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडीत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि सर्वांच्या मेहनतीची प्रशंसा केली.

या दिमाखदार पदवी वितरण समारंभाने एका सुंदर प्रवासाची सांगता करून नवीन शैक्षणिक प्रवासास सुरुवात केली आणि नव्या स्वप्नांना नवे पंख दिले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पहिली शैक्षणिक पायरी यशस्वीपणे पार करून, त्यांच्या आयुष्याचा हा नवा अध्याय ज्ञान, कौशल्य आणि यशाच्या प्रकाशाने न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाची सांगता आभार व्यक्त करून व मुलांना अल्पोपहार देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका प्रज्ञा जोशी, शिरीन काझी, कल्याणी शेळके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती ढाके व पल्लवी रणसिंग यांनी केले.

You may have missed