May 2, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बाणेर चे रहिवासी भरत गिते यांचा विशेष सत्कार

पुणे :

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे सीओईपीचे राज्यपाल नियुक्त नियमक मंडळाचे सदस्य आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाणेर गावचे रहिवासी भरत गिते यांचा विशेष सत्कार केला. औद्योगिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेत अहिल्यानगर जिल्ह्यात सुपा औद्योगिक क्षेत्रात ५०० कोटींची गुंतवणूक आणि १२,०० रोजगार निर्मिती यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, राज्यातील औद्योगिक विकासाला नवी चालना मिळेल. आणि राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला गती मिळणार आहे.

या गुंतवणुकीत भरत गिते यांनी मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या कार्याचा गौरव करताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.