July 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील कै. बाबूराव शेठजी गेणूजी बालवडकर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

बालेवाडी :

बालेवाडी येथील कै. बाबूराव शेठजी गेणूजी बालवडकर विद्यालय मनपा शाळा क्रमांक १२१बी व१५१ या ठिकाणी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

 

सकाळी ध्वजारोहण करुण कार्यक्रमाला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली कवायत अतीशय सुरेख होती. सुर्यसेन बनसोडे या विद्यार्थ्याने छान असे भाषण केले . त्याच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहन वरदे साहेब, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली ताई सायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, भाजपाचे चिटणीस लहू बालवडकर, स्वाभिमानीचे प्रकाश तात्या बालवडकर, दिलीप तात्या बाबुराव बालवडकर, सामाजिक कार्यकर्ते किसन बापू बालवडकर, हनुमंत बालवडकर, दत्तात्रय बालवडकर, बालेवाडी पोलीस पाटील आनंदराव कांबळे, चंद्रशेखर बालवडकर, नरेंद्र बालवडकर व गोसेवक संदीप बालवडकर सकाळच्या पत्रकार शितल बर्गे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका वाघमारे मॅडम, बाबर मॅडम, मोरे मॅडम घोरपडे मॅडम स्वाभिमानीचे शहराध्यक्ष संदीप बालवडकर, वाघमारे सर, मोरे मॅडम,आणि सर्व शिक्षकवृंद आणि सेवक,रखवालदार आणि पालक उपस्थित होते.