March 14, 2025

Samrajya Ladha

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील जेष्ठ नागरिकांनी राहुलदादा बालवडकर आयोजित हुर्डा पार्टीचा लुटला मनमुराद आनंद..

सुस :

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी हुर्डा पार्टी व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत हुर्डा पार्टीचा आनंद उपभोगला. या कार्यक्रमास माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना बीपी चेक करायची मशीन गिफ्ट देण्यात आली.

 

यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी हुर्डा खाण्याचा मनमुराद आनंद तर लुटलाच शिवाय यावेळी आयोजित विविध मनोरंजनाच्या खेळात सहभागी होत बक्षिसे देखिल जिंकली. तसेच ज्येष्ठांनी गाण्याच्या तालावर ठेका घेत डान्स देखील केला.

आपल्या परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असुन त्यांना दैनंदिन जीवनामध्ये एक वेगळा आनंद उपभोक्ता यावा म्हणून हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. नागरिकांच उत्साह आणि जल्लोष पाहून एक वेगळे मानसिक समाधान लाभले. त्यांच्याशी विविध विषयावरती गप्पा मारताना अनेक अनुभव ऐकायला मिळाले. हुर्डा पार्टीत ज्येष्ठांची सोबत एक अविस्मरणीय आनंद देऊन गेली. येणाऱ्या पुढील काळात देखील प्रभागाच्या विकासासोबत असेच विविध उपक्रम राबविले जातील.
राहुलदादा बालवडकर (उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)