औंध :
औंध येथील कस्तुरबा गांधी वसाहतीमध्ये भाजपा नेते श्री सचिन मानवतकर यांच्या तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त औंध परिसरातील रिक्षा चालक बंधुना मोफत अपघाती विमा, सीएनजी कुपन व मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेचे आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
आपल्या औंध परिसरामध्ये मोठ्या संख्येने रिक्षाचलक बांधव असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रस्त्यावर धावपळ सुरू असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून एक लाख रुपये आरोग्य विमा सीएनजी कूपन तसेच आरोग्य शिबीर राबविले आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिकांची काळजी घेण्याचा माझा मानस असून त्या दृष्टीने छोट्या मोठ्या उपक्रमातून मी प्रयत्न करत आहे.
– सचिन मानवतकर (भाजपा नेते)
सचिन मानवतकर हे आमचे असे नेते आहेत जे सतत नागरिकांची सेवा करण्यासाठी अग्रेसर असतात. त्यांनी नेहमीच विविध उपक्रमातून नागरिकांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यावेळी देखील त्यांनी रिक्षा चालक बांधवांसाठी आरोग्य विमा, आरोग्य शिबिर आणि सीएनजी कुपन वाटपाचा कार्यक्रम ठेवून कौतुकास्पद काम केले आहे.
– आमदार सिद्धार्थ शिरोळे
या कार्यक्रमासाठी मा.बाळासाहेब रानवडे, मा.सचिन वाडेकर, मा.गणेश कलापुरे, मा.सौरभ कुडंलीक, मा.सागर मदने, मा.सागर परदेसी, सौ.शीला भालेराव, मनिष रानवडे, सौ.नुतन गायकवाड, सौ.शारदा सोडी, सौ.शारदा पुलवळे, सौ.सुबद्रा कुंभार, खंडागळे ताई, मा.विकास लोंढे, मा.मनोज ठोसर, मा.निलेश शिंदे, मा.अक्षय घडसिंग, मा.रोहित घडसिंग, मा.अमोल अडागळे, मा.राम मंडलीक यांची विशेष उपस्थिति होती.
कार्यक्रमाचे आयोजन श्री सचिन मानवतकर मित्र परिवार यांच्या तर्फे करण्यात आले होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी