March 14, 2025

Samrajya Ladha

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा – नगरसेवक – वैभव मुरकुटे यांचे प्रतिपादन

पौड :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल च्या पौड शाखेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड, मास पीटी, नृत्य आणि भाषणे केली.

 

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित पाहुणे माननीय श्री. वैभव मुरकुटे नगरसेवक , श्री राजेश विचारे उपाध्यक्ष भाजपा कोथरूड विधानसभा मतदारसंघ, श्री बाळासाहेब दांडेकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,श्री योगेश सोनवणे,श्री गणेश सोनवणे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

इयत्ता पाचवी,सहावी, सातवी, आठवी, नववीच्या मुलांनी तायक्वांदो मध्ये स्वतःचे शरीर दगडासारखे मजबूत बनवणे हे त्याचे मुख्य लक्ष आहे.त्यामध्ये त्यांनी पंच किक कोपराने वार आणि गुडघ्याने मारणे याची मुख्यतंत्रे प्रदर्शित केली.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल संचालिका सौ रेखा बांदल संचालिका शिवानी बांदल तसेच मुख्याध्यापिका निर्मल पंडीत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे माननीय श्री वैभव मुरकुटे सर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांनी केलेल्या विविध विविध प्रकारांचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा मुलाचा वाटा आहे असे याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता मोरे आणि संध्या देशमुख यांनी केले.