सुस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेत आज रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने आणि देशभक्तीमय उत्साहाने साजरा करण्यात आला.
26 जानेवारी हा भारतातील एक महत्त्वाचा दिवस आहे जो देशाने 1950 मध्ये आपल्या राज्यघटनेने अवलंब केला होता. या ऐतिहासिक घटनेने भारताचे सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्यात रूपांतर केले .या प्रसंगाच्या स्मरणार्थ आपला भारत दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो हा देश देशभक्तीच्या उत्साहाने भरलेला असतो.
पेरीविंकल प्रशालेत भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7:30 वाजता प्रमुख पाहुणे श्री सोपान मोरे एक्स नेव्ही मॅन श्री मधुकर पायगुडे एक्स आर्मी मॅन , श्री शंकराव आवळे योग पंडीत तसेच शाळेचे डायरेक्टर श्री संदीप ढमढेरे, श्री गणेश येवले – एक्स आर्मी मॅन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित तसेच सचिन खोडके सर आणि नेहा माळवदे यांच्या उपस्थित शिक्षक ,विद्यार्थी आणि पालक वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रथम ध्वज पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण होताच ध्वजाला सलामी राष्ट्रगीत व झेंडा गीत विद्यार्थ्यांनी सादर केलें. शांती आजादी आणि एकतेचे प्रतीक म्हणून कबुतरांना पिंजऱ्यातून आझाद करून आकाशात उडवण्यात आले. जणूकाही विश्वशांतीचा संदेश या पक्षांनी संपूर्ण विश्वाला दिला आहे.
विद्यार्थी आणि कर्मचारी, तसेच पालक वर्ग राष्ट्रध्वजाला आदरांजली वाहत लक्षपूर्वक उभे राहिले.ध्वजारोहण समारंभानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी परेड केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी संस्कृत ,हिंदी, इंग्रजी भाषेमधून भाषण केले
ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्ये यांचा समावेश होता. या कार्यक्रमात भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवण्यात आला तसेच एकता आणि देशभक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
मुख्याध्यापिका, सौ. निर्मल पंडित यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि लोकशाही, समानता आणि न्याय या मूल्यांचे पालन करण्याचे महत्त्व यावर भर देणारे भाषण दिले.
प्रमुख पाहुणे श्री सुभेदार गणेश येवले यांनी सर यांनीही उपस्थितांना संबोधित केले आणि विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी उद्याचा भारत कसा घडवला पाहिजे तसेच आपण स्वतःचे स्किल ओळखून काय केले पाहिजे यासाठी प्रोत्साहित केले.
श्री सोपान मोरे एक्स नेव्ही मॅन यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला जमिनीवरून पाण्यात ,पाण्यातून जमिनीवर पाण्यातून ,पाण्यात कसे युद्ध केले जाते तसेच पाणबुड्यांना कसे डुबवायचे याबाबत त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले .श्री मधुकर पायगुडे यांनी नेव्ही आर्मीमध्ये आलेले अनुभव तसेच शांती सेना मराठा बटालियन तसेच देशासाठी प्राणाचे बलिदान देण्याचे यांनी केलेले मोलाचे कार्य सांगितले प्रथम देशाचे कार्य आणि नंतर फॅमिली याबाबत संदेश दिला.
श्री शंकराव आव्हाळे प्राचीन व योगाशिक्षक यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे शारीरिक हालचाली उत्तम प्रकारे करून योगाचे प्रकार करून दाखवले त्यानंतर जलक्रिया जलनीति, रबरनीति, या सर्व क्रिया करून दाखवल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना योगा करण्यासाठी प्रोत्साहन दिले
आमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने भव्य यशस्वी झाला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना निर्माण केली आणि त्यांना राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली.
संपूर्ण शालेय वातावरण देशभक्तीमय झाले होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रफुल्ला मॅडम आणि अमिता मॅडम यांनी केले .या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ.रेखा बांदल तसेच शिवानी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले. पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षक गण व विद्यार्थी वर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने प्रजासत्ताक दिन संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.
More Stories
महिला सशक्तीकरणासाठी संवादाची नवी दिशा – पुनम विधाते यांचा पुढाकार बालेवाडी येथील ब्राउरिया सोसायटीमध्ये महिलांची भेट घेत साधला संवाद
बालेवाडीत नवचैतन्य हास्य व गायक क्लबला शिवम बालवकर स्पोर्ट फाउंडेशनची मदत..
बाणेर येथील कै.बाबुराव हबाजी सायकर (गणराज) चौक ते डेजी सोसायटीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन संपन्न…