September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

प्रेरणादायी राष्ट्रप्रेमाने उजळला प्रजासत्ताक दिन सोहळा पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पिरंगुटमध्ये देशभक्तीचा जल्लोष!

पिरंगुट :

पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुरेश ज्ञानेश्वर कदम (इंडियन आयडॉल मराठी फेम व पैलवान), जान्हवी सुरेश कदम (उद्योजिका), प्रदीप साठे (उद्योजक) आणि गणेश अभिमाने (पत्रकार) उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ७ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लाजिम नृत्य सादर करून कार्यक्रमाला जोश भरला. ९ वीच्या विद्यार्थ्यांनी “जय जवान जय किसान” या थीमवर देशभक्तीपर गीत सादर केले.
विद्यार्थिनी अंतरा रायरीकर, इश्वरी शेंबगे आणि प्रियल वाघमारे यांनी प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. प्रमुख अतिथी सुरेश ज्ञानेश्वर कदम यांनी “दिल दिया है जान भी देंगे” आणि “कानडा राजा पंढरीचा” ही गीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

पत्रकार गणेश अभिमाने यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतं, नृत्य आणि भाषणांचे विशेष कौतुक केले.त्यांनी विद्यार्थ्यांना कर्तव्यनिष्ठा, देशसेवा आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली.

राजेंद्र बांदल सर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देत, “देशासाठी झोकून देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमुळेच आपली लोकशाही बहरली आहे,” असे सांगितले. कार्यक्रमास संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल, प्राचार्य निर्मल पंडित यांनी मार्गदर्शन केले.

शाळेच्या पर्यवेक्षिका , माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार आणि पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे उपस्थित होते. सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कांबळे आणि भाग्यश्री मिसाळ यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला व विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.

 

You may have missed