September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याचे काम पेरीविंकल शाळेतील विद्यार्थ्यांचे : शंकरराव राऊत

बावधन :

पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व ध्वजगीत, राष्ट्रीय गायनाने तिरंग्याला मानवंदना देऊन करण्यात आली. इयत्ता ६वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वरात देशभक्ती पर गीत सादर केले. मराठी, इंग्रजी अशा विविध भाषांमधून विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांचे मनोगत व्यक्त केले.

इयत्ता 8वी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोऱ्याचे नयनरम्य प्रात्यक्षिक सादर करून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. याप्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.

यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य केंद्रीय शेती धोरण समिती अध्यक्ष, वनस्पती रोगशास्त्र विभाग मंत्रालय मुंबई प्रमुख, कोकण कृषी विद्यापीठ दापोली श्री. शंकरराव राऊत तसेच माजी नगरसेविका, मनसे राज्य नेत्या, माजी अध्यापिका सौ. पुष्पाताई कानोजिया व उद्योजक श्री. बाळासाहेब ढोकळे, संचालिका सौ. रेखा बांदल, यंग डायरेक्टर शिवानी बांदल, यश बांदल उपस्थित होते. यावेळी राज्यासाठी योगदान दिले तरच विद्यार्थी घडतील असे मार्गदर्शन राऊत यांनी केले.

संस्कारक्षम वयात आणि जडणघडणीच्या काळात विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करण्याचा व्यापक विचार यामागे केला जातो. प्रजासत्ताकदिन साजरे करण्यामागे देशभक्ती जागृत व्हावी, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी, सामाजिक ऐक्य वाढीस लागावे, अशी व्यापक दृष्टी असते. शाळा-महाविद्यालयांतदेखील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे, स्वातंत्र्यवीरांचे मोल कळावे, देशभक्ती जागृत व्हावी, सामाजिक भान यावे आणि कुठेतरी जगण्याची दृष्टी मिळावी अशा व्यापक विचाराने राष्ट्रीय सणउत्सव जाणीवपूर्वक साजरे केले जातात असे मत सौ. रेखा मॅडम यांनी मांडले.तसेच संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत स्वतंत्र भारतानंतर आपली जी कर्तव्य आहेत ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाची सांगता मुलांना खाऊ वाटप करून व वंदे मातरम ने करण्यात आली. कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित तसेच पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

You may have missed