म्हाळुंगे :
म्हाळुंगे भागातील फॉर्च्यून एक्विलाइफ सोसायटीच्या रस्त्याचे डांबरीकरण आणि सोसायटीच्या आवारातील झाडा-झुडपांची छाटणी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या प्रयत्नामुळे करण्यात आली.
म्हाळुंगे भागातील फॉर्च्यून एक्विलाइफ सोसायटीच्या सभासद आणि पदाधिकाऱ्यांशी काही दिवसांपूर्वी युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी केलेल्या चर्चेदरम्यान नागरिकांनी त्यांच्या भागातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि सोसायटीच्या आवारात वाढलेल्या झाडा-झुडपांच्या समस्येबाबत लक्ष वेधले होते. या मागण्या गांभीर्याने घेऊन,आज तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सोसायटीच्या आवारातील झाडा-झुडपांची छाटणीदेखील चांदेरे परिवाराच्या वतीने करण्यात आली.
आपल्या प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबूराव चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कार्यरत आहोत. नागरिकांचा विश्वास जिंकणे आणि त्यांच्या गरजांना प्राधान्य देत विकासकामे वेळेत पूर्ण करणे, हीच आमची खरी बांधिलकी आहे.
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)



More Stories
*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*
*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा*
“वीज सडक पाणी” प्रश्न, बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने मांडला महाराष्ट्राच्या मंत्रालयात.