May 24, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

भाजपाच्या संघटनात्मक रचनेतील नवनियुक्त अध्यक्षांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

पुणे :

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाडीच्या प्रमुखांची नियुक्ती नुकतीच प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केली. यातील पुणे जिल्ह्यातील शहर व जिल्हाध्यक्ष, तसेच विविध मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज करुन शुभेच्छा दिल्या.

 

भारतीय जनता पार्टीच्या २०२४ मध्ये महाविजयासाठी पक्षाने संघटनात्मक रचनेतील  ७० जिल्हाध्यक्ष तथा विविध मोर्चाच्या प्रमुखांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी नुकतीच केली. यात प्रामुख्याने पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शंकर जगताप, पुणे ग्रामीण (मावळ) शरद बुट्टे पाटील, (बारामती) वासुदेव नाना काळे, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्षपदी गणेश भेगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे, कामगार आघाडी विजय हरगुडे, क्रीडा प्रकोष्ट संदीप आप्पा भोंडवे यांच्याकडे जबाबदारी दिली.

या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री आणि प्रदेश कार्यालय मंत्री रवीजी अनासपुरे, पुणे शहर प्रभारी अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भीमराव तापकीर, उमाताई खापरे, सुनील कांबळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.