बाणेर :
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बाणेर, बालेवाडी, सुस आणि महाळुंगे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने रस्त्यांवर कचरा आणि प्लास्टिक मोठ्या प्रमाणात पसरले आहे, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पूनम विधाते यांनी तातडीने पाहणी केली. त्यांनी संबंधित महानगरपालिका (मनपा) अधिकाऱ्यांसोबत परिसराची पाहणी करत रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेला कचरा त्वरित उचलण्याचे आणि धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पूनम विधाते यांनी सांगितले की, “मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यांवरील कचरा आणि पडलेली झाडे यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आम्ही मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी मनपाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.”
मनपा अधिकाऱ्यांनी पूनम विधाते यांच्या सूचनेची दखल घेतली असून लवकरच कचरा उचलण्याची आणि धोकादायक झाडांची छाटणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Bitwise pashicha area pan Baner madhe yeto. Jara tikde yeun paha. Gatari ch pani asach rastyavar wahat ast. Building construction chya krupene purn area madhe walu ani reti pasarli ahe. Classic example of civic apathy