भुकुम :
मॉडर्न कॉलेज गणेशखिंड व किर्लोस्कर वसुंधरा फाऊंडेशन यांनी भूकूम येथे खाटपेवाडी तलावाच्या काठी 22 जुलै 23 रोजी वृक्षारोपण केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज 70 देशी झाडें लावण्यात आली.
खाटपेवडी तलावाच्या संवर्धनाचा उपक्रम गेली चार वर्षे किर्लोस्कर वसुंधरा तर्फे ग्रामस्थानच्या मदतीने राबविण्यात येत आहे.14 फेब्रुवारी 2019 ला या तळ्याच्या बांधकामचे काम सुरु झाले. 13 एन.जी.ओ व ग्रामस्थ यांच्या बरोबर वसुंधरा फौंडेशन ने हा उपक्रम सुरु केला. या वर्षी या मध्ये मॉडर्न महाविद्यालय सहभागी झाले. महाविद्यालयातील रोपवाटिकेतील 70 देशी झाडांची रोपे या वेळी लावण्यात आली.
या वेळी बोलताना मा माधुरीताई सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, “आज नळाने पाणी येत असल्यामुळे विध्यार्थांचा निसर्गाशी संबंध कमी झाला आहे म्हणून आम्ही त्यांना या उपक्रमाशी जोडून घेतले आहे. हा उपक्रम राबविणणारे सर्व जण निसर्ग वाचविण्यासाठी खूप काम करणारे आहेत.”
महाविद्यालय नेहमीच वृक्षारोपण सारख्या कार्यकामात सहभागी होत असतें. निसर्ग रक्षणासाठी आम्ही नेहमीच पुढे असतो –
डॉ संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय
आज देशात 175 ठिकाणी स्थानिक लोकांच्या सहकार्याने नदी पुनर्जीवनाचे काम चालू आहे. आपण झाडें लावून त्याची निगा राखतो. त्यामुळे तलावाच्या काठी पेरू व चिक्कू अशी फळे आली आहेत. स्थानिक लोकांच्या सहकार्यासाठी वसुंधरा फौंडेशन त्यांचे आभारी राहील असे आर. आर. देशपांडे, चेअरमन, वसुंधरा फाऊंडेश म्हणाले.
या प्रसंगी मा मयुरी आमले, सरपंच, मा अंकुश खाटपे, मा अनिल गायकवाड, मा आर आर देशपांडे, मा वीरेंद्र चित्राव, सुवर्णा भांबुरकर , डॉ प्राची क्षीरसागर, मॉडर्न महाविद्यालयातीलं उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षककेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…