October 18, 2024

Samrajya Ladha

योगीराज पतसंस्थेला 7 राज्यातील 24 एमबीए विद्यार्थ्यांची भेट……

बाणेर :

वामनीकॉम येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट अंतर्गत शेती व्यवसाय व्यवस्थापन मध्ये शिक्षण घेत असलेले देशातून तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक व महाराष्ट्र या 7 राज्यातील 24 विद्यार्थी सहकाराचा शासन आणि व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी योगीराज पतसंस्थेला भेट दिली.

याप्रसंगी ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेची आर्थिक प्रगती कशी झाली तसेच संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती सांगितली तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

संस्थेचे तज्ञ सभासद, निवृत्त शासकीय अधिकारी योगीराज देवकर यांनी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना संस्थेची माहिती सांगितली व मार्गदर्शन केले.

मयूर घाडगे या विद्यार्थ्याने यावेळी सांगितले की, योगीराज पतसंस्था ही उत्कृष्ट काम करत आहे. आम्ही सर्वांनी या प्रशिक्षण दरम्यान खूप संस्थांना भेटी दिल्या परंतू योगीराज पतसंस्थेत मिळालेले प्रेम आणि मान सन्मान आम्हाला कोठेच मिळाला नाही.

याप्रसंगी योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर, संचालक संजय बालवडकर, गणेश तापकीर, माजी संचालक वसंत माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे, तसेच सर्व स्टाफ उपस्थित होता.