November 22, 2024

Samrajya Ladha

जनता माझी, मी जनतेतला..! बालेवाडी येथे अमोल बालवडकर यांचा उद्या ‘जनआशिर्वाद’ मेळावा, ३५००० पेक्षा जास्त नागरीक सहभागी होणार…

बालेवाडी :

कोथरूड विधानसभा मतदारसंघात अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी रविवार ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर ‘जनआशिर्वाद’ मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यात सर्वांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी सरंजाम वाटप करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षापासून अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या वतीने नागरिकांची दिवाळी गोड करण्याचं काम सरंजाम वाटपाच्या माध्यमातून केले जाते.

‘जनता माझी, मी जनतेतला’ हेच धोरण ठेवून जनता हिच माझ्यासाठी व्हीआयपी असून उपस्थित नागरिकांमधून काही नागरीकांना स्टेजवर बसवून ‘जनआशिर्वाद’ मेळावा संपन्न होणार आहे. कोथरूड विधानसभेतील पस्तीस हजारापेक्षा जास्त नागरिक या मेळाव्यास उपस्थित राहून मला आशीर्वाद देतील असा ठाम विश्वास मला आहे – अमोल बालवडकर(माजी अध्यक्ष पुणे शहर सुधारणा समिती)