बाणेर :
बाणेर येथील प्लॅटिनम सोसायटी मध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेतल्यानंतर सोसायटी मधील नागरिकांनी त्यांना आरती घेण्याचा मान देऊन सन्मान केला. तसेच चांदेरे यांनी चाकणकर मळा येथील आविष्कार सोसायटीला भेट दिली.
सोसायटी वर्ग आपल्या संस्कृतीचे जतन करत सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. नवरात्री उत्सवाचे निमित्त साधून विविध सोसायट्यांना भेट देऊन तेथील नागरिकांची भेट घेत नागरी समस्या जाणून घेत पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुराव चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या अनेक अडचणी समोर येतात त्या कशा सोडविल्या जातील यासाठी प्रयत्न करत आहे : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!