October 18, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील श्री.गणपतराव बालवडकर यांचा नवी दिल्ली येथे “भारत सन्मान २०२४”  पुरस्कार देऊन गौरव…

बालेवाडी :

बालेवाडी येथील श्री.गणपतराव म्हातुजी बालवडकर यांना “भारत सन्मान २०२४” या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम ईंडियन हेरिटेज आणि हेल्थ केअर सेंटर यांच्यावतीने नवी दिल्ली येथील ईंडिया ईंटरनॅशनल सेंटर येथे पार पडला.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत संस्थेचा क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे जस्टीस मनमोहन सिंग, भारताचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांच्याहस्ते व आयकर महासंचालक नासीर अलि, डॉ. सुभाष चंद्रा, आयआरएस श्री. नय्यर अलि नाजमी, डॉ. दीप गोयल यांच्या उपस्थितीत गणपतराव बालवडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार हा नेहमीच प्रेरणादायी असतो. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या कामाची दखल घेतली गेली त्यामुळे विशेष आनंद वाटतो. माझे कुटुंब, मित्र परिवार, यांची मला मोलाची साथ लाभते. पुरस्काराने गौरविण्यात येणे अभिमानाची बाब असून पुढे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणादायी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे : श्री गणपतराव म्हातुजी बालवडकर( संस्थापक/अध्यक्ष श्री खंडेराय प्रतिष्ठान)