October 18, 2024

Samrajya Ladha

सुस शाखेतील पेरीविंकल शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसह गरबा दांडियाच्या तालावर दुमदुमली अवघी सुस नगरी !!!

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेमधील पेरीविंकल शाळेच्या प्रांगणात विदयार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या समवेत रंगला दांडीया व रासगरबा. दांडिया व गरबाची रास सुस मधील पेरीविंकलच्या प्रांगणात खास. शारदीय नवरात्रीच्या उत्साहामध्ये भव्य दिव्य दांडीया व रासगरबा सुस शाखेच्या पेरीविंकलच्या प्रांगणामध्ये संपन्न.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सुस शाखेमध्ये शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून त्या निमित्त भव्य दिव्य दांडीया व रासगरबा चे आयोजन पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या प्रांगणामध्ये कऱण्यात आले होते. विध्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांचा यात सहभाग होता. शाळेच्या प्रांगणात गरबाच्या तालावर समस्त गावकरी व विद्यार्थी यांनी ठेका धरला. कूपन व पासेस विकत घेऊन ग्रामस्थांनी गरबा व दांडीया खेळण्यासाठी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला.

पेरिविंकल शाळा ही मुळशी तालुक्यात नावाजलेली इंग्लिश मिडीयम स्कूल असून अभ्यासाबरोबरच संस्कृती चा ठेवा असणारी संस्कृती व संस्कार जोपासण्याचा अविरत प्रयत्न करणारी शाळा म्हणून तिचा नावलौकिक आहे.

शनिवारी संध्याकाळी या गरबा व रास दांडियाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात संध्याकाळी करण्यात आले होते. गरबा व दांडीया ड्रेस चा पेहराव करुन सर्व शिक्षकवर्ग व पालकगण यात सहभागी झाले होते.
या गरबा व रास दांडीया सोहळ्याचा आरंभ शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल शाळेच्या तरुण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल यांच्या समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात करण्यात आला. या गरबा दांडीया सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे दामिनी पथकाच्या इन्स्पेक्टर भोसले मॅडम, करे मॅडम व सय्यद मॅडम यांच्या उपस्थितीने समस्त महिला सुरक्षित आहेत हा संदेश देण्यात आला. पेरीविंकल मधील कन्या व महिला कायम सुरक्षित आहेत व शाळा कायम त्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करते असे सांगितले.

कार्यक्रम रंगात येत असतानाच सर्व सहभागी यांनी पेटीत टाकलेल्या पास व कूपन यातून दर अर्ध्या तासाने लकी ड्रॉ काढून त्यांना सरप्राइज गिफ्ट देण्यात आले. शाळेचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडीत यांच्या हस्ते प्रथम लकी ड्रा काढून सरप्राइज गिफ्ट देण्यात आले. तसेच सेकंड राऊंड ला प्रमुख पाहूणे दमिनी पथक च्या इन्स्पेक्टर यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आले. समस्त शिक्षकवर्ग, पालक,विदयार्थी व ग्रामस्थ यांनी केलेल्या रंगीबेरंगी व गरबा नृत्य पेहराव याला देखील मान देऊन बेस्ट कॉस्च्युम व बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे यांना स्पेशल गिफ्ट देण्यात आले.
याबरोबरच शाळेच्या काही पालकांनी फूड स्टॉल म्हणजेच खाद्यपदार्थ याचे आयोजन केले होते. समोसा,सबुडणावडा, पावभाजी असे विविध स्टॉल ला गरबा खेळून सर्वांनी भेट देउन सर्व खाद्यपदार्थांचा देखील मनमुराद आनंद लुटला.

या संपूर्ण गरबा व दांडीया सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल व शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते . पर्यवेक्षक सचिन खोडके, नेहा माळवदे व हाऊस कॅप्टन स्मिता श्रीवास्तव यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने आजचा हा गरबा दांडीया सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. सर्वांनी यात गरबा व दांडीयानृत्याचा मनमुराद आनंद घेतला. गरबा व दांडीया मध्ये सामील होऊन खरोखर शारदीय नवरात्र अनुभवून नवरात्रीच्या नऊ देवींचा जागर करत आदिशक्ती चा प्रत्यक्ष अनुभव आल्यासारखे वाटले.

वन्दे मातरम् या गीतावर गरबा नृत्याचा ठेका धरत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील व श्रद्धा यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाचे डेकोरेशन, सजावट, स्टेज, लायटिंग, साऊंड याचे नियोजन हे सर्व शिवराज कदम व किरण करडे यांनी केले होते.