November 21, 2024

Samrajya Ladha

बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ राबवत पथनाट्य सादर केली जन जागृती..

बावधन :

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी ०२ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत हा दिवस साजरा केला जातो. त्याला अजून बळकटी देण्यासाठी नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक अणि बावधन खुर्द आरोग्य कोठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका व स्वच्छ सहकारी सेवा संस्था संयुक्त विद्यमाने ” पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता , ओला व सुका कचरा वेगळा करून घंटा गाडीला देणे तसेच, सॅनेटरी वेस्ट कचरा विलगीकरण करणे असे बावधन खुर्द येथे राहणाऱ्या रहिवासी शाळेतील विद्यार्थी यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छते बाबत जनजागृती करून महत्त्व पटवून देण्यात आले व स्वच्छता शपथ कार्यक्रम घेण्यात आला.

सदर पथनाट्य सादर करताना वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक श्री हनुमंत चाकणकर, मुकादम श्री.राम गायकवाड, स्वच्छ सहकारी सेवा संस्था आणि टीम स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल मधील २०० विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका श्रीमती साळवे मॅडम तसेच इतर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी, स्वच्छ संस्थेचे समन्वयक श्रीमती पुनम सराटे मॅडम, पुणे मनपा आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

मा.उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री.संदीप कदम साहेब, मा.उपायुक्त परिमंडळ क्र.०२ श्री. अविनाश सपकाळ साहेब मा.महापालिका सहाय्यक आयुक्त मा.श्री.शंकर दुदुसकर साहेब यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.राम सोनावणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान १४ सप्टेंबर २०२४ ते ०१ ऑक्टबर २०२४ राबविण्यात आले.