October 23, 2024

Samrajya Ladha

योगी पार्क, बाणेर येथील अंतर्गत रस्त्यावरील धोकादायक वाटणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छटाई जयेश मुरकुटे यांच्या पाठ पुराव्यामुळे पूर्ण..

बाणेर :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष, मा. जयेश मुरकुटे यांच्या पाठ पुराव्यामुळे योगी पार्क, बाणेर येथील अंतर्गत रस्त्यावरील झाडांच्या धोकादायक फांद्या औंध क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी काढून टाकल्या.

योगी पार्क, बाणेर येथील अंतर्गत रस्त्यावरील झाडांच्या धोकादायक फांद्या मुळे येथील नागरिकांना तसेच वाहन चालकांना धोका निर्माण झाला होता. झाडांच्या फांद्या रस्त्यात आल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून जयेश मुरकुटे यांनी यासंबंधीचे पत्र मी दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी मा. सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना दिले होते. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेतली सहाय्यक आयुक्तांनी तर्क संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन धोकादायक वाटणाऱ्या झाडांच्या फांद्याची छटाई करून दिली.

नागरीकांच्या दृष्टिने छोट्या परंतू महत्वाच्या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे असते. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर लक्ष देण्यापेक्षा अगोदर ती समस्या सोडविल्या जाव्यात या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. योगी पार्क परिसरात अंतर्गत रस्त्यावर झाडाच्या फांद्या धोकादायक होत्या म्हणून त्याचा पाठपुरावा करुण हि समस्या दुर केली.
– जयेश मुरकुटे
कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)