बावधन :
बावधनच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सकाळी प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. मुलांनी गांधीजींची भजने सादर केली.महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती विदयार्थीनी रागिणी जयभाय हिने मुलांना सांगितली. मुलांनी आपले आपले वर्ग, व्हरांडा स्वच्छ केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी ‘जय जवान जय किसान’ असे घोषवाक्य दिली. अशा प्रकारे शाळेमध्ये स्वछता अभियान राबवण्यात आले.
यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठान तसेच पेरीविंकल शाळेचे संस्थापक मा. श्री..राजेंद्र बांदल व संचालिका सौ. रेखा बांदल व शिवानी बांदल यांनी मुलांना स्वच्छतेचे धडे दिले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित, पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..