बालेवाडी :
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आयोजित भव्य इनडोअर नवरात्री दांडीया उत्सव दिनांक ४ ऑक्टोंबर ते ६ ऑक्टोबर २०२४ रोजी दररोज सायंकाळी ६.०० ते १०.०० वाजेपर्यंत राहुल दादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय दसरा चौक बालेवाडी येथे संपन्न होणार आहे.
या दांडिया उत्सवात प्रमुख आकर्षण म्हणून चला हवा येऊ द्या फ्रेम श्रेया बुगडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अभिनेत्री पूजा सावंत उपस्थित राहणार आहे. या दांडिया महोत्सवामध्ये स्पर्धेतील प्रत्येक विजेत्यास चांदीच्या दांडिया भेट दिल्या जाणार असून प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यास आकर्षक भेटवस्तू भेट दिली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर चे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या संयोजनातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या नवरात्री दांडीया उत्सवासाठी पावसाच्या शक्यतेमुळे भव्य इनडोअर हॉल तयार केला असून महिलांची सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाणार आहे तसेच विविध प्रकारचे फूड स्टॉप आणि पार्किंगची व्यवस्था देखील उपलब्ध आहे.
यावेळी सर्वोत्तम ग्रुप डान्सर, सर्वोत्तम जोडीदार डान्सर, सर्वोत्तम महिला व पुरुष डान्सर, सर्वोत्तम बाल डान्सर, सर्वोत्तम ज्येष्ठ नागरिक डान्सर निवडण्यात येणार असून त्यांना चांदीच्या दांडिया बक्षिस म्हणून दिल्या जाणार आहे. या दांडिया उत्सवाला फक्त महिला कपल व फॅमिलीला प्रवेश दिला जाणार आहे.



More Stories
*संगीताच्या सुरेल मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; दिवाळी बोनस वितरणातून शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान, पेरीविंकल परिवारात उत्साह आणि स्नेहाचा जागर!*
*औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन*
बाणेरच्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ प्रकल्पाला स्टॉपवर्क! सर्व्हे नं. ५४ मधील रोहन लेहेर लेआउटच्या अॅमेनिटी स्पेस गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेची कारवाई*