पुणे :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम सर्वत्र पोहचविण्यासाठी, तसेच मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
महायुतीला ताकत द्यायची आहे. अजित पवार सांगतील तोच निर्णय पुण्यात घेतला जातो. आम्ही मनाने कोणताही निर्णय घेत नाही. यादीवर काम करा. बूथ कमिट्या तयार करा. तसेच अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केलेल्या मान्यवरांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
आमचे मार्गदर्शक दीपकभाऊ मानकर यांच्या संघटन कौशल्याच्या आणि अनुभवाच्या जोरावर येणारी विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याचा आमचा निर्धार : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!