November 21, 2024

Samrajya Ladha

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह अभियान’ यशस्वी आयोजन..

औंध :

स्वच्छता ही सेवा 2024 अन्वये औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत मा. संदीप कदम उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, मा. अविनाश सकपाळ उपायुक्त परिमंडळ क्र. 2, मा. गिरीष दापकेकर महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री विजय भोईर  यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिपॉईंट हॉस्पिटल गायत्री हॉटेल चौक औंध ते एसटीपी प्लान्ट राम नदी पूल या ठिकाणी व ज्युपिटर हास्पिटल ते डी एस के गांधकोष याठिकाणी डीप क्लिनिंग ड्राइव्ह अभियान राबविण्यात आले.

तसेच बाणेर रेसिडेन्सी येथील 200 नागरिक यांनी सहभाग घेऊन पॅनकार्ड क्लब रस्ता येथील परिसर स्वच्छता करून या अभियांना मध्ये 55 मे. टन कचरा, 37 ब्रास माती व राडारोडा, झाडांचे कटिंग उचलून घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.

सदर अभियान मध्ये उप अभियंता श्री. हवालदार, लांडे, सर्व कनिष्ठ अभियंता, सर्व आरोग्य निरीक्षक, मोकादम, सफाई सेवक, आदर पुनावाला संस्थाचे कर्मचारी उपस्थित होते.