November 21, 2024

Samrajya Ladha

गांधी जयंतीचे औचित्य साधत बावधन पेरीविंकलच्या विद्यार्थ्याची गांधी भवनला भेट

बावधन :

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी 3 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी भवन, कोथरूड येथे भेट दिली. या शैक्षणिक सहलीचे आयोजन गांधी जयंती निमित्त करण्यात आले होते.
या मुलांनी संपूर्ण परिसराचा फेरफटका मारला तसेच गांधी भवन परिसरातील ग्रंथालयाला भेट दिली. या शैक्षणिक सहलीमध्ये मुलांनी गांधीजीचे संपूर्ण जीवन दर्शवणारे सुंदर असे फोटो प्रदर्शन बघितले.

प्रदर्शन बघून झाल्यावर मुलांनी महात्मा गांधीजींचा जीवन प्रवास सांगणारा लघुपट बघितला. या चित्रपटातून मुलांना महात्मा गांधीजींचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी चे कार्य व संघर्ष कळाला.

गांधीभवनाच्या शैक्षणिक सहलीचा मुलांनी खूप आनंद घेतला हा सर्व अनुभव त्यांच्यासाठी खूप खूप आनंददायी व प्रेरणादायी होता. मुलांनी इथे बरेच प्रश्न विचारले आणि शिक्षकाने त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले.

लहानपणापासूनच मुलांना आपले स्वातंत्र्य सेनानी व आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची ओळख व्हावी, त्यांना राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळावे, त्यांचे कार्य, त्यांचा त्याग मुलांना अवगत व्हावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल यांनी मुलांचे कौतुक केले व गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या सहलीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक गणेश सर, सौ. निर्मल पंडित, पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके व त्यांच्या शिक्षकांनी केले होते.