November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील श्री तुकाई मंदिराकडे जाणारा रस्ता दर्जेदार व्हावा म्हणून समीर चांदेरे यांच्या प्रत्यक्ष भेट देवून रस्ता बनविणाऱ्या संबंधितांना सूचना…

बाणेर :

बाणेर येथील श्री तुकाईदेवी मंदिराच्या टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याचे काम पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी प्रत्यक्ष भेट देवून संबंधितांना रस्त्याच्या कामातील त्रुटी सांगितल्या व रस्ता बनत असताना तो अधिक चांगला दर्जा असलेला बनावा यादृष्टीने तशा सूचना दिल्या.

बाणेर मध्ये श्री तुकाईदेवी मंदिरात नवरात्री उत्सव निमित्त मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक दर्शनाला येतात म्हणून हा रस्ता लवकर पूर्ण करण्याचा मानस होता परंतु अनियमित वातावरणामुळे डांबीरकरणाचे काम काही दिवस पुढे गेले असून लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण देखील केलं जाणार आहे. तत्पूर्वी संपूर्ण रस्त्यावर विजेचे खांब लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्ता लवकरच तयार झाल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी नागरिकांची सोय होणार आहे : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

बाणेर येथे श्री तुकाई मंदिरात भाविकांची नेहमीच रेलचेल असते. मंदिरात जाणारा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर मंदिरात दर्शनाला ये जा करण्याकरिता भाविकांना सुविधा प्राप्त होणार आहे. म्हणून या रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी नागरिकांची इच्छा असून त्याच दृष्टीने रस्ता चांगला दर्जा असलेला बनावा म्हणून युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी भेट देत रस्त्या संबंधी काही सूचना संबंधितांना दिल्या.