May 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे नवरात्रोत्सव निमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशन व श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव यांच्या वतीने ‘ग्रुप दांडिया व गरबा महोत्सव’ चे आयोजन..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे नवरात्रोत्सव निमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशन व श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव यांच्या वतीने ‘ग्रुप दांडिया व गरबा महोत्सव’ शनिवार दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं.०८ वा सोमेश्वर मंदिरासमोर आयोजित केला आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सोमेश्वरवाडी आणि परिसरातील नागरिकांना नवरात्री उत्सव आनंद घेता यावा म्हणून विविध प्रकारचे नावाजलेले ग्रुप दांडीया व गरबा खेळण्यासाठी बोलाविले आहेत. त्यामुळे परिसरातील महिलांसह सर्वांसाठी एक सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे : सचिन दळवी (सरचिटणीस भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ)

सोमेश्वरवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.