October 18, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील मृणाल सुमित गायकवाड यांना ‘रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डस्’च्या ब्रँड अँबेसॅडर पदाचा बहुमान!

इमर्जीन लिडरशिप पुरस्कारानेही सन्मानित, पुण्यात झाला सन्मान

पुणे :

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या प्रतिभा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पुरुष तसेच विविध संस्थांना त्यांच्या केलेल्या कार्याची दखल रेड बुक मध्ये आय एस बी एन अंतर्गत घेतली जाते. या रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड च्या ब्रँड अँबेसिडर पदी काम करण्याचा बहुमान बालेवाडी पुणे येथे असलेल्या अभिनेत्री मॉडेल सौंदर्यसम्राज्ञ मृणाल सुमित गायकवाड यांना मिळाला आहे.

त्याचबरोबर भारत विरासत प्रतियोगितेच्या राष्ट्रीय संयोजक म्हणून मृणाल गायकवाड यांनी रेड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डच्या माध्यमातून संस्कृती आणि पुरातन वर्षाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल इमर्जन लीडरशिप या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वर्ल्ड सेवन वंडर्स पब्लिकेशन आणि रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड चे मुख्य संपादक व चिकित्सक्रांती महाजन यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या पुरस्कार प्रदान समारंभात शहीद भगतसिंह यांचे पुतणे सरदार किरणजीत सिंह त्याचबरोबर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विश्वकोश निर्मिती मंडळचे संचालक डॉ शामकांत देवरे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार पुण्यात प्रदान करण्यात आला.