September 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर मध्ये ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी रंगणार “भव्य दांडिया नाईट”!!

बाणेर :

आमदार आणि कॅबिनेट मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील प्रस्तुत, श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सर्व नागरिकांसाठी भव्य ‘दांडिया नाईट’ शनिवार ५ आणि रविवार ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सावरकर क्रीडा मैदान, ताम्हाणे चौक, औंध बाणेर लिंक रोड बाणेर येथे आयोजित केला आहे.

यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि आगामी फुलवंती चित्रपटाची नायिका प्राजक्ता माळी ह्या दांडिया नाईट साठी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्व महिला पुरुष नागरिकांसाठी बघायला किंवा खेळायला निःशुल्क आहे.

या कार्यक्रमांमध्ये दर तासाला होणाऱ्या लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षिसांची लयलूट होणार. याशिवाय बेस्ट बालक, महीला, पुरुष डान्सर , बेस्ट जोडी आणि बेस्ट वेशभूषा अशी विविध बक्षिसे दोन्ही दिवशी दिली जाणार आहेत.

भव्य ग्रुप डान्स स्पर्धा हे या ‘दांडिया नाईट’ चे अजून एक आकर्षण असून ग्रुप डान्स साठी रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. तसेच यावेळी विविध खाद्य पदार्थ स्टॉल असणार असून, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षितता याला कार्यक्रम नियोजनात विशेष प्राधान्य दिले आहे.

बाणेर मध्ये प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात होणाऱ्या दांडिया नाइट मध्ये सहभागी व्हायला, खेळायला किंवा बघायला जरूर यावे असे निमंत्रण संयोजिका कल्याणी टोकेकर, निकिता माताडे, जागृती विचारे आणि वैशाली कमाजदार यांनी केले आहे.

 

 

You may have missed