October 23, 2024

Samrajya Ladha

सौ. पूनम विधाते यांच्यावतीने आयोजीत गरबा वर्कशॉपला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

बाणेर :

बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील माता भगिनींसाठी येणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने वामा वुमेन्स क्लबच्या वतीने सौ. पूनम विशाल विधाते यांच्या माध्यमातुन गरबा वर्कशॉप चे आयोजन केले होते. या वर्कशॉप मध्ये महिलांनी उस्फूर्तपणे सहभागी होत गरबा कसा खेळायचा याचे मार्गदर्शन घेतले.

नवरात्रीमध्ये आपल्याला देखील गरबा, रास दांडिया खेळता यावा ही महिलांची इच्छा असते. म्हणूनच खास महिलांसाठी रास दांडिया गोरक्षक चे आयोजन केले. महिलांनी देखील या वर्कशॉप मध्ये सहभागी होत रास दांडिया गरबा कसा खेळावा याचे प्रशिक्षण घेतले. महिलांना याचा उपयोग होऊन नवरात्र उत्सवात सहभागी होता येईल व गरब्याचा आनंद उपभोक्ता येणार आहे : सौ. पूनम विशाल विधाते (अध्यक्ष : वामा वुमेन्स क्लब/कार्याध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर)

गरबा वर्कशॉप मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी गरबा नृत्य ट्रेनर निकिता सराफ आणि सुवर्णा कोटगिरे यांनी महिलांना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात गरबा प्रशिक्षण दिले.