बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष, मा. जयेश मुरकुटे यांच्या संकल्पनेतून जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून बाणेर बालेवाडी परिसरातील विविध सोसायटीमध्ये दर शनिवारी आणि रविवारी मोफत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड शिबिर राबवण्यात येत आहे.
यामध्ये नवीन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड काढणे व दुरुस्ती यासंबंधीची कामे करणे नागरिकांना सहजपणे आपल्या घरापाशी उपलब्ध होत असल्यामुळे बाणेर आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांनी या शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला आहे.
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आवश्यक असणारी कामे नागरीकांना करतांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. तरीही नवीन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड काढणे व दुरुस्ती यासंबंधीची कामे करणे अपरिहार्य असते. त्यांची हि कामे मार्गी लावण्याच्या साठी व नागरिकांचा त्रास कमी व्हावा या हेतूने दर शनिवारी आणि रविवारी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड शिबिर राबवित आहोत : जयेश मुरकुटे (कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष कोथरुड विधानसभा)
बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे परिसरातील विविध सोसायटी तर्फे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन कडे या शिबिराची मागणी होत आहे. उपक्रमाबद्दल जयेश मुरकुटे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!