October 18, 2024

Samrajya Ladha

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित “गौरी सजावट स्पर्धा- २०२४” रोहिणी चांदेरे विजेत्या तर ‘सोसायटी अंतर्गत गणेशोत्सव’ स्पर्धेत सारथी सोसायटी ने मिळविला प्रथम क्रमांक…

बाणेर :

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या “गौरी सजावट स्पर्धा- २०२४” आणि सोसायटी अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बाणेर येथील बंटारा भवन या ठिकाणी संपन्न झाला. गौरी सजावट स्पर्धेचा प्रथम क्रमांक रोहिणी चांदेरे यांनी तर सोसायटी अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सारथी सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला.

गणेशोत्सव आला की ‘गौरी सजावट स्पर्धा’ आयोजित करत गेली 18 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बाणेर, बालेवाडी सूस, म्हाळुंगे परिसरातील महिला भगिनींना गौरीची आकर्षक आरास करत सांस्कृतिक ठेवा जोपासण्याकरिता प्रोत्साहित केले आहे. गौरी सजावट स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता परिसरातील महिला भगिनी यांचा उत्साह प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणून येतो. दिवसेंदिवस या स्पर्धेची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यातच यावर्षीपासून प्रथमच सोसायटी अंतर्गत गणेशोत्सव स्पर्धेला सुरुवात करत सोसायटीतील नागरिकांचा उत्साह वाढविला आहे. उत्कृष्ट नियोजन आणि आकर्षक बक्षिसे या स्पर्धेत दिली जातात. सोसायट्यांचा लाभलेला सहभागामुळे ही स्पर्धा आणखीनच उल्लेखनीय ठरली.

गणेशोत्सव म्हंटले की आपल्या घरातील परिसरातील वातावरण अतिशय उत्साही असते. उत्साह द्विगुणित व्हावा व महिलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा अधिक वाव मिळावा या दृष्टीने गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले जाते. आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सोसायट्यांचा विचार करून सोसायटी अंतर्गत गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आपण आयोजित करत असलेल्या या स्पर्धेला परिसरातील नागरिक महिला भगिनी आणि सोसायट्यांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ही स्पर्धा आणखी जोमात भराविण्याचा उत्साह आमच्यात निर्माण होतो : समीर चांदेरे (अध्यक्ष: राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर)

गौरी सजावट स्पर्धेमध्ये शेकडो महिलांचा सहभाग असतो तर यावर्षी प्रथमच सुरू केलेल्या सोसायटी अंतर्गत गणेशोत्सव स्पर्धेला परिसरातील 280 सोसायट्यांनी सहभाग घेतला. यामुळेच बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे या भागातील सर्वात मोठी आणि अविरत सुरू असलेली स्पर्धा म्हणून नावाजलेली आहे. स्पर्धेच्या निरीक्षणासाठी सोसायटीमधील नागरिकांच्या मधून विशेष जूरी नेमली होती, ज्यांनी निपक्षपणे स्पर्धेचे विजेते जाहीर केले.

पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुराव चांदेरे साहेब, सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अनिल परब ( माजी संघचालक – विद्यापीठ भाग), अरविंद वळसणकर, प्रकाश बोकील, गिरीधर राठी, पद्माकार पुंडे, रामकुमार मौर्य, नितीन मेटकरी, सारंग वाबळे, बडवे ग्रुपच्या सर्वेसर्वा सुप्रिया बडवे, राहुल बालवडकर, सागरभाऊ बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन श्री. राहुल बालवडकर (उपाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,पुणे शहर), श्री. समिर चांदेरे (अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष,पुणे शहर), श्री. सागर बालवडकर (सचिव-खंडेराय प्रतिष्ठान) व श्री. नितीन कळमकर (कार्याध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोथरुड मतदार संघ) यांनी केले होते.

गौरी सजावट स्पर्धेतील महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने ११ महिलांना पैठणी साडी भेट देऊन गौरविण्यात आले.

गौरी सजावट स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक- सौ.रोहिणी चांदेरे
द्वितीय क्रमांक-सौ.सुवर्णा बालवडकर
तृतीय क्रमांक-सौ.सोनाली लोंढे
चतुर्थ क्रमांक- सौ.जीवनश्री बोंद्रे
पाचवा क्रमांक-सौ.रत्नमाला देडगे
सहावा क्रमांक-सौ.अश्विनी बालवडकर
सातवा क्रमांक-सौ.नयन कटके
आठवा क्रमांक-सौ.कुसुम कोल्हे
नववा क्रमांक- सौ.पूजा चांदेरे
दहावा क्रमांक- सौ.नीलम गायकवाड
अकरावा क्रमांक-सौ.वृषाली भोते
बारावा क्रमांक- सौ.नेहा निंबाळकर
तेरावा क्रमांक- सौ.दीप्ती पाडळे
चौदावा क्रमांक-सौ.अर्चना कर्जतकर
पंधरावा क्रमांक-सौ.लता मगर

उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्या महिला भगिनी –

सौ.तनया सणस,सौ.निकिता कदम,सौ.सुमन भोते,सौ.तृप्ती वायकर,सौ.सुमन चांदेरे,सौ.नीलम हुलावळे,सौ.त्रूनाली बालवडकर,सौ.पूजा सावंत,सौ.गायत्री मानमोडे,सौ.मंजूश्री राऊत,सौ.स्वाती बालवडकर,सौ.तनिष्का इंगळे,सौ.अर्चना कानवटे,सौ.पूनम पाडाळे,सौ.अश्विनी काळभोर,सौ.ज्ञानेश्वरी भंडारे ,सौ.गंगासागर मांटे,सौ.लक्ष्मी कुंभार,सौ.गोकर्णा जाधव,सौ.अनुराधा उपासे,सौ.रंजना भागवत,सौ.कल्याणी चांदेरे,सौ.ईश्वरी दंडवते,सौ.भाग्यश्री कळमकर,सौ.संगीता पाटील

पैठणी विजेत्या महिला भगिणी –
सौ.विद्या पाटील,सौ.ललिता भिसे,सौ.दिप्ती पाडाळे,सौ.साधना भगत,सौ.स्वाती जाधव,सौ.अलका सावंत,सौ.इंदू अरोरा,सौ.वर्षा पवार,सौ.सरला माडेकर,सौ.सत्यभामा शेळके,सौ.कविता शिंदे

सोसायटी अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे

प्रथम क्रमांक-सारथी सोसायटी
द्वितीय क्रमांक-युतिका सोसायटी
तृतीय क्रमांक-जार्डीन सोसायटी
चतुर्थ क्रमांक-क्रिस्टल गार्डन सोसायटी
पाचवा क्रमांक-त्रिमूर्ती एलिना सोसायटी
सहावा क्रमांक-वेलवर्थ सोसायटी
सातवा क्रमांक-पुराणिक फेज ४ सोसायटी
आठवा क्रमांक-पिनॅकल नीलांचल सोसायटी
नववा क्रमांक-काँकोर्ड प्रोक्सिमा सोसायटी
दहावा क्रमांक-ऑर्वी सोसायटी
अकरावा क्रमांक-उज्वल एनक्लेव्ह सोसायटी
बारावा क्रमांक-मधुकोष सोसायटी
तेरावा क्रमांक-रोहनं लेहेर सोसायटी
चौदावा क्रमांक-कुणाल अस्पायर सोसायटी
पंधरावा क्रमांक-वसंत बहर सोसायटी

उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे –

24k सेरेनो सोसायटी,पीव्हिलियन रेजन्सी सोसायटी,ब्रावरिया सोसायटी,कक्कड लावीदा सोसायटी,इटरनल सोसायटी,कस्तुरी सोसायटी,यश ऑर्किड सोसायटी,रिलीकॉन फेलिसिया सोसायटी,कपिल ट्विंकल सोसायटी,दर्शन पार्क सोसायटी,लेगसी इऑन सोसायटी,साई दत्त सोसायटी,आयव्हरी इस्टेट सोसायटी,हरीलीला सोसायटी,ओमेगा रेसिडेन्सी