पुणे विद्यापीठ :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेमध्ये नवीन संगणक कक्ष उद्घाटन समारंभ पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एक्सप्लिओ सोल्युशन लिमिटेड कंपनीचे सीईओ प्रसादजी सटकर व सी. एस. आर. प्रमुख सत्यजित पाटील, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्रजी देव, विद्यापीठ हायस्कूल शाला समिती अध्यक्षा सीमा कांबळे , सचिव डॉ.पी. व्ही.एस शास्त्री, उपसचिव प्रदीपजी वाजे , कंपनीचे इतर मान्यवर विकास गुप्ता ,संदीप पाटील ,वर्षा राऊत, विजया बराटे, वैशाली पोतदार,सी एस आर समन्वयक सुवर्णा ढमढेरे, पल्लवी बसाळ, प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी केला.
प्रमुख पाहुणे प्रसादजी सटकर यांनी सक्षम तंत्रज्ञानाने समृद्ध पिढी घडावी असे सांगितले, तर सत्यजित पाटील यांनी नवीन संगणक वर्गाचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी करावा असे सांगितले. संस्थेचे या कंपनी सोबत असलेले ऋणानुबंध असेच रहावेत असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्रजी देव यांनी केले.
संगणक वर्गाबद्दल मनोगत विद्यार्थी चैतन्य मगर व शिक्षिका वैशाली सैंधाने यांनी केले. एक्सप्लिओ सोल्युशन लिमिटेड या कंपनीतर्फे सी एस आर फंडांतर्गत २१,१०,०७०/ रुपयाची देणगी संगणक वर्गासाठी देण्यातआली. कार्यक्रमाचे आभार गौरी गोळे यांनी मानले तर सूत्रसंचालन स्नेहा वाघमारे यांनी केले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचा ‘मान्सून सेफ्टी ड्राईव्ह 2025’ उपक्रम..
औंध येथे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न*
महाळुंगे आणि सुस परिसरातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यावर भर देणार आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे ‘जनता दरबार’, मध्ये नागरिकांना आश्वासन…