September 17, 2024

Samrajya Ladha

78 वा स्वातंत्र्य दिन पेरीविंकल स्कूलच्या सूस शाखेत इंडिया गेटच्या देखाव्याने जल्लोषात साजरा !!!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सूस शाखेमध्ये आज गुरूवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्य दिन *इंडिया गेटच्या देखाव्याने* अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. पेरीविंकल प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित यांच्या उपस्थितीमध्ये कदम तालावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डायरेक्टर कु. शिवानी बांदल , मुख्याध्यापिका निर्मल पंडीत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळेस मान्यवर प्रमुख अतिथी दामिनी पथक रूपाली भोसले ,जया शेंडगे, पुनम करे आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने तिरंग्याला सलामी देउन झेंडा गीत गायन विद्यार्थ्यांनी तबलाच्या तालावर सुरेख सादर केले . तसेच देशभक्तीपर “उठा राष्ट्रवीर हो “हे गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कृष्णा अंभुरे सर यांनी या गीताचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी ,इंग्रजी ,संस्कृत या भाषेतून भाषण केले . तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले . संगीत शिक्षिका यांच्या ए मेरे वतन के लोगो….या गाण्याने सर्व स्वातंत्र्यवीरांना आजच्या दिनी स्मरण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.

दामिनी पथकातील रूपाली भोसले यांनी स्त्रियांनी सुरक्षा कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले .
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित मॅडम यांनी विकसित भारताविषयी संकल्पना थोडक्यात व मोजक्या शब्दात अचूकपणे स्पष्ट करुन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व देशाविषयी असणारी भक्ती, देशनिष्ठा व्यक्त केली.

संस्थेच्या तडफदार डायरेक्टर कु.शिवानी बांदल मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे कौतुक केले आणि विकसित भारतासाठी भावी विद्यार्थ्यांना तयार होण्यासाठी सज्ज केले. कलाशिक्षक शिवराज सर आणि विद्यार्थ्यांनी अतिशय अप्रतिम इंडिया गेट चा देखावा सादर करुन रजपथाचा मार्ग सुशोभित केला होता.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ.रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले. पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षक गण व विद्यार्थी वर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात हा स्वातंत्र्य दिन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिथा जॉनी व प्रफुल्ला पाटील यांनी केले होते.