कोथरूड :
पंडीत फार्म कोथरुड येथे १५ ॲागस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाऊंडेशन व ॲटेनेक्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानाने कोथरुड विधानसभा मतदार संघातील नागरीकांकरीता “Amol Balwadkar, Independence Day Run 2.0” चे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड विधानसभा परिसरातील २५०० पेक्षा जास्त नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला.
यावेळी प्रामुख्याने कोथरुड मतदार संघातील व पुणे शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुले यांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवुन या मॅरेथॅानमध्ये 3km, 5km व 10km धावण्याचा आनंद लुटला. तसेच ज्येष्ठ नागरीकांकरीता विशेष आयोजित केलेल्या “वॅाकेथॅानच्या” माध्यमातुन त्यांनी देखिल या स्पर्धेचा आनंद लुटला.
कोथरूड विधानसभेतील सर्वच नागरिकांनी माझ्या प्रत्येक उपक्रमाला उदंड प्रतिसाद देत माझा उत्साह वाढविला आहे. शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुले सर्वांनीच मोठ्या उत्साहात ह्या रन मध्ये सहभाग घेऊन ही मॅरेथॉन यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. अशाच स्वरूपाचे विविध कार्यक्रम घेण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच उपलब्ध राहील. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा : अमोल बालवडकर (माजी नगरसेवक)
यावेळी सर्व सहभागी खेळाडुंना मेडल्स देवुन तसेच विजेत्यांना विविध बक्षिसे देवुन गौरवण्यात आले.
More Stories
बालेवाडीमध्ये अथर्व फाउंडेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
बाणेर-सुस येथील ‘तीर्थ टॉवर्स’ सोसायटीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील : समीर चांदेरे
महाळुंगे बालेवाडी क्रीडा नगरीमध्ये सतेज संघ बाणेरच्या वतीने “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने पुरुष व महिला “पुणे लिग कबड्डी स्पर्धा २०२५” स्पर्धेचे भव्य आयोजन..